कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून अनेकांना प्रचंड मदत केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याने लोकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती आणि आता त्याने काहींना ऑक्सिजन सिलेंडर, औषधं, इंजेक्शन्स पाठवले आहेत. कोरोना संकट कमी झालं असलं तरी सोनू सूदचे मदतकार्य अद्याप सुरू आहे. दरम्यान आता सोनू सूदने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेता सोनू सूदने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणाला की, बालपणापासून आपण ऐकत आलो आहोत की दिवाळी हा सण आनंद आणि प्रकाशाचा आहे. पण हादेखील विचार केला पाहिजे की कितीतरी लोक असतील जे दिवाळी साजरी करण्यासाठी सक्षम नसतील. त्यामुळे उगाच पैसे वायफळ गोष्टींवर वाया घालवू नका. त्या लोकांची दिवाळी साजरी करा ज्यांच्या जीवनात अंधःकार आहे. त्या माणसांना दिवाळी साजरी करण्यासाठी मदत करा. तेव्हा तुमची ही दिवाळी स्पेशल ठरेल आणि ही दिवाळी वेगळी ठरेल.
मराठी सिनेमात काम करण्याची व्यक्त केली इच्छासोनू सूद नॅशनल जिओग्राफीक इंडिया वाहिनीवरील दहा भागांची सीरिज 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो आहे. नुकतेच सोनू सूदने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, माझी मराठी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. जर चांगली स्क्रीप्ट मिळाली तर मला नक्कीच काम करायला आवडेल. मराठी चित्रपटांच्या कथा खूप छान असतात आणि मला मराठीत इंटरेस्टिंग स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच मराठी भाषेतही काम करू शकेन.