श्रिया पिळगांवकर या ठिकाणी साजरी करतेय दिवाळी
एकुलती एक या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकरने पदार्पण केले होते. श्रियाने तिच्या अभिनयाची चुणूक या चित्रपटातून सर्वांना दाखवून दिली होती. तिची आता थेट परदेशी टिव्ही सिरिजमध्ये वर्णी लागली आहे. लवकरच प्रेक्षकांना श्रियाच्या या ब्रिटीश टीव्ही सीरिजचा भाग पाहता येणार आहे. या सीरिजचे नाव बिचम हाऊस असे असून सध्या ती या सीरिजचे चित्रीकरण करते आहे. या सीरिजच्या सेटवर ती दिवाळी साजरी करते आहे. या सेटवरून तिने सोशल मीडियावरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रिया पिळगांवकरने सेटवरील फोटो शेअर करून लिहिले की, बिचम हाऊस सेटवरून तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा.
श्रिया सध्या लंडनमध्ये 'बिचम हाऊस' या सीरिजसाठी शुटिंग करत आहे. तिने याचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती या सीरिजमध्ये 'चंचल' नावाच्या मुलीचे पात्र साकारणार आहे. 'एकुलती एक' चित्रपटानंतर श्रियाने शाहरूखच्या 'फॅन' चित्रपटात भूमिका साकारली होती. ती आता आतंरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. श्रियाने 'एकुलती एक' चित्रपटानंतर शाहरूखच्या 'फॅन' चित्रपटात भूमिका साकारली होती. आता ती आतंरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.