Join us

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे १०० भाग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 2:39 PM

संत ज्ञानेश्वर महारांजाची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय.

महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे.महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे. 27 सप्टेंबरपासून  'ज्ञानेश्वर माऊली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

संत ज्ञानेश्वर महारांजाची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही या मालिकेला खास पसंती मिळतेय. मंत्रमुग्ध करणारे संगीत मनाला स्पर्श करुन जाते. या मालिकेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या संगीतबद्ध करण्यात आले आहेत.  'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेतील शीर्षकगीतालाही सुरुवातीपासून चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.  हे शीर्षकगीत बेला शेंडेने गायले आहे.तर  चिन्मय मांडलेकर या मालिकेची निर्मिती केली आहे.

 

या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहेत. १७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरदिग्पाल लांजेकर