सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात.काम कोणतंही असो सोनू सूद त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात तो कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच सोनू सूदच्या यशाचे खरं कारण आहे. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही.
इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. कोरोना काळातही याची प्रचिती आली. कोरोनाच्या संकटकाळात एकटाच सेलिब्रेटी मैदानात उतरत गरजुंची मदत केली. आजही त्याचे मदतकार्य सुरुच आहे. म्हणूनच अनेकांसाठी तो मसिहा ठरला आहे. सध्याच्या घडीला सोनू सूद चाहत्यांसाठी कोणत्या देवापेक्षा कमी नाही. अगदी देवासारखी चाहते सोनू सूदची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात हे तर सा-यांनाच माहिती आहे.
कोरोना काळात तिथे बघावं तिथे फक्त आणि फक्त सोनू सूदच्याच नावाची चर्चा झाली. सोनू सूद आज त्याच्या कामामुळेच लोकप्रिय बनला आहे. कोणी दुधाने त्याचा अभिषेक करतंय, तर कोणी त्याच्या नावाने व्यवसाय करतोय तर कोणी त्याची प्रतिमा बसवत मंदिरं उभारतोय. चाहत्यांचे सोनू सूदवर असलेले प्रेम हे शब्दांत व्यक्त करणे कठिणच. सोनू सूनदच्या खासगी आयुष्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. सोनू सूदच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला सोनू सूद कोट्यवधी संपत्तीचा मालिक आहे.
caknowledge.comने दिलेल्या माहिती नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात 2600 चौरस फुटांच्या 4 बीएचके फ्लॅटमध्ये सोनू सूद राहतो. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. सोनू सूद उत्तम अभिनेता असण्यासोबत उत्तम बिझनेसमनही आहे. जुहूमध्ये सोनू सूदचे हॉटेल आहे. याशिवाय अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच एक निर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे.
मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार असून किंमत 66 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त ऑडी क्यू 7 या गाडीची किंमत जवळपास 80 लाख रुपये इतकी आहे. पोर्शची पनामा कार ज्याची किंमत 2 कोटी आहे. सिनेमाचे मानधन आणि ब्रँड एन्डॉर्समेंट ही त्याच्या मुख्य कमाईचे साधन आहे.