अबोली कुलकर्णी
बॉलिवूडमध्ये पैसा, ग्लॅमर, स्टारडम, शानशौक असं सगळं आहे. याच ग्लॅमर आणि स्टारडमसाठी कित्येक स्ट्रगलर्स इंडस्ट्रीत येण्यासाठी धजावतात. बॉलिवूडच्या ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांना फेम, प्रसिद्धी तर मिळते. मात्र, काही कलाकार असेही असतात ज्यांचा अभिनय ‘ए’ लिस्टर्स कलाकारांच्या तोडीस तोड असूनही त्यांना ग्लॅमर आणि स्टारडम काही मिळत नाही. पाहूयात कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स....
राधिका आपटेबंगाली, तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका रंगवणारी अभिनेत्री राधिका आपटे हिने ‘शोर: इन द सिटी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ‘हंटर’ आणि ‘बदलापूर’ अशा दमदार चित्रपटातून तिने भूमिका साकारल्या. तिने उत्कृष्ट भूमिका साकारूनही तिला हवे तेवढे स्टारडम मिळाले नाही. मात्र, आता असे वाटते की, तिला यापेक्षाही जास्त स्टारडम मिळण्याची गरज आहे.
भूमी पेडणेकर‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने डेब्यू केला. आयुषमान खुराणा या ए लिस्टर स्टारसोबत तिला पहिला चित्रपट मिळाला. तिची ‘संध्या’ ही भूमिका तिने चांगलीच गाजवली. कोणत्याही ए लिस्टर अभिनेत्रीला लाजवेल असा अभिनय तिने केला. पण तरीही स्टारडमच्या बाबतीत ती मागे पडली ते पडलीच.
ताहिर राज भसीन प्रदीप सरकार यांचा ‘मर्दानी’ चित्रपट सर्वार्थाने हिट ठरला. राणी मुखर्जीच्या अभिनयासोबतच ताहिर राज भसीन याचा अभिनय देखील अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची थाप मिळवली.
सुरवीन चावलाटीव्ही अभिनेत्रीसोबतच पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनेत्री सुरवीन चावलाने काम केले. ‘हेट स्टोरी २’ मधून तिने साकारलेला अभिनय लक्षवेधी ठरला. अनुराग कश्यप यांच्या ‘उगली’ या चित्रपटातूनही तिने उत्कृष्ट अभिनय साकारला. तरीही तिला इतरांप्रमाणे स्टारडमची मजा अनुभवायला मिळालीच नाही.
स्वरा भास्कर आनंद एल. राय यांच्या ‘तन्नू वेड्स मन्नू’ आणि ‘रांझणा’ चित्रपटातून स्वराने चांगली भूमिका वठवली. तसेच जाहीरातीच्या बाबतीतही तिने उत्कृष्ट काम केले. सोशल मीडियावर ती कायम तिचा स्वत:चा पवित्रा घेताना दिसते. एखाद्या मुद्यावर ती ठामपणे तिची बाजू मांडते. पण, तरीही स्टारडमच्या बाबतीत ती मागेच राहिली.