Join us

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहितीय का? दिसायलाही आहे फार सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 20:16 IST

मेधा आणि महेश मांजरेकर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटला.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही महेश मांजरेकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनीही 'काकस्पर्श', 'नटसम्राट' या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारत साऱ्यांच्या नजरा आकर्षित केल्या होत्या. 

मेधा आणि महेश मांजरेकर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटला. मेधा सोबत महेश मांजरेकर यांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई मांजरेकरला बॉलिवूडचा गॉडफदार सलमान खाननेच लॉन्च केले होते. सई सलमान खानसोबत 'दबंग ३' सिनेमात झळकली होती. तिच्या भूमिकेलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती.  

 

महेश मांजरेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही तितकाच रस असतो. फिल्मी करिअरप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात. महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर या दोघांची जोडीही रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरत असते. मेधा मांजरेकरसोबत महेश मांजरेकर यांचे दुसरे लग्न आहे. 

महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणामुळे महेश आणि दीपा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मुलं मात्र अश्वमी-सत्या महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात.

दीपा मेहता यांचा अभिनयाशी काहीही संबंध नसला तरी त्या क्वीन ऑफ हार्टस हा साड्यांचा ब्रँड चालवतात. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंगचे कामही करते. अश्वमीसुद्धा अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.अतिशय मनमौजी असल्याचे तुम्हाला त्यांचे फोटो पाहून जाणवेल.  

टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकर