Join us

'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:21 AM

‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’च्या यंदाच्या वर्षीचे सूत्रसंचालक किकू शारदा आणि जेमी लीव्हर करणार आहेत. या सोहळ्यात किकू शारदा आपल्या मजेशीर टिप्पणी आणि विनोदी नाट्याने प्रेक्षकांना हसवताना दिसतील.

‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’च्या यंदाच्या वर्षीचे सूत्रसंचालक किकू शारदा आणि जेमी लीव्हर करणार आहेत. या सोहळ्यात किकू शारदा आपल्या मजेशीर टिप्पणी आणि विनोदी नाट्याने प्रेक्षकांना हसवताना दिसतील. ‘सुनहरे पल’ या मालिकेत किकूने ‘कयामत की रात’मधील खलनायक तांत्रिक कालासुरच्या रूपात केलेल्या धमाल विनोदामुळे प्रेक्षक पोट धरून हसतील. 

या सोहळ्यात किकूने कालासुरची हुबेहूब वेशभूषा केली असून त्यासाठी चेहऱ्यावर आणि हातावर खास मुखवटा लावला होता.  यासंदर्भात किकूने सांगितले, “मी आजवर अनेक विनोदी प्रसंग सादर केले असून ते करताना मला स्वत:ला खूप मजा येते. यातील ‘सुनहरे पल’ या मालिकेतील प्रसंग माझ्या विशेष आवडीचे असून त्यात मला ‘स्टार प्लस’वरील लोकप्रिय कार्यक्रमांसाठी तीन वेगवेगळे अवतार करायला मिळाले. पण त्यातील कायम लक्षात राहणारे अवतारा हा कालासुर या तांत्रिकाचं आहे. त्याचं भयानक रूप पाहून तो कोणाला हसवू शकेन, अशी कल्पनाही करता येणार नाही. कालासुरचं हुबेहूब रूप साकारणे ही फार किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया होती कारण त्याच्या चेहऱ्यावर एक खास प्रकारचा मुखवटा चढवावा लागतो. तसेच त्याच्या हातात असलेली जड कडी आणि अन्य दागिने आणि त्याची वेशभूषा करण्यासाठी आणखी वेळ लागतो. त्याचा विशिष्ट प्रकारचा मुखवटा चेहऱ्यावर बसविण्यासाठी मला तब्बल एक तास लागला. पण त्याचा विनोदी अवतार सादर करताना मला जशी मजा आली, तशीच तो पाहताना प्रेक्षकांनाही येईल, अशी आशा करतो.” 

टॅग्स :किकू शारदा