Join us

'धडाकेबाज' चित्रपटात कवट्या महाकाळची भूमिका साकारणारा अभिनेता होता तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:14 PM

उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. एक गाडी बाकी अनाडी, पोरींचा मामला, डॉक्टर डॉक्टर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे.  

 कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. असा हा असा हा चतुरस्त्र अभिनेता होता बिपीन वर्टी.'धडाकेबाज' चित्रपट आजही रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनयाने या चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली होती. लक्ष्मीकांत बेर्डेसह इतर कलाकारांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. 

चित्रपटातली लक्षवेधी भूमिका कवट्या महाकाळ ही भूमिकाही तितकीच गाजली होती. मुखवटा आड दडलेला  खलनायकाचा चेहरा नेमका कोणत्या अभिनेत्याचा असाही प्रश्न कदाचित चाहत्यांना पडला असावा. सांगाड्याच्या मुखवट्यातला या खलनायकाने चांगलीच धडकी भरवली होती. तर ही भूमिका साकारली होती.बिपीन वर्टी यांनी.या चित्रपटानंतर ही भूमिका प्रचंड गाजली. इतकंच काय तर आजही ही भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे. 

 

पडद्यावर खलनायक बनत रसिकांना धडकी भरवणारे बिपीन वर्टीहे उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. एक गाडी बाकी अनाडी, पोरींचा मामला, डॉक्टर डॉक्टर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे.  बिपीन वर्टी ह्यांनी लोकप्रिय चित्रपट ‘झपाटलेला’मध्ये खुबड्या खविसची भूमिका साकारली होती.माझा छकुला चित्रपटातल्या गेटअपमुळे त्यांना ओळखणेही अशक्यच होते.विशेष म्हणजे गिधाड या भूमिकेने सर्वांनाच धडकी भरवली होती.बिपीन आणि महेश कोठारे यांच्यात खूप चांगली मैत्री होती.इतकंच काय तर महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात बिपीन झळकले आहेत.आज बिपीन वर्टी हयात नसले तरी त्यांच्या भूमिकांमुळेच ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमहेश कोठारे