अभिनेत्री श्वेता शिंदेने अभियातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. ‘लागीर झालं जी’ मालिकेची निर्मीती श्वेता शिंदेनेच केली होती. मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेलाही प्रचंड पसंती मिळाली होती. त्यानंतर श्वेता 'डाॉक्टर डॉन' मालिकेतही झळकली होती. श्वेताने मालिकाच नाही तर सिनेमातही काम केले आहे.
श्वेताच नाही तर श्वेताच पतीही हिंदीमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. श्वेताने संदीप भन्साळीसह लग्न केले आहे. 'अपराधी कौन' या मालिकेदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
अखेर २००७ साली पुण्यामध्ये मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थित दोघांचे लग्न पार पडले होते. संदीप भन्साळीने हिंदी मालिका विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. 'वो रेहनेवाली मेहलों की' ,'ईश्वर साक्षी', 'क्रिस और क्रीष्णा', 'मोहिनी', 'प्यार के दो नाम', 'एक राधा एक श्याम' या गाजलेल्या मालिकेत त्याने भूमिका साकारल्या आहेत.
संदिप भन्साळी आता अभिनय क्षेत्रात काम करत नसून पुण्यामध्ये तो कपड्यांचा बिझनेस करतो. पुणेच नाही तर साताऱ्यातही त्यांचा व्यवसाय आहे.'हरी ओम साडी डेपो' नावाने कपड्यांचे भलेमोठे शोरुमचा संदिप भन्साळी मालक आहे. अभिनय सोडून संदिप भन्साळी एक उत्तम बिझनेसमन बनला आहे.