अभिनेत्री तब्बूने आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. आजही तब्बू अभिनयक्षेत्रात सक्रीय असून रुपेरी पडद्यावर झळकत असते. आजही तिची जादू कायम असल्याचे पाहायला मिळते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सवरही चाहते तितकेच फिदा होत असतात. फिल्मी करिअरमुळे चर्चेत असणारी तब्बूच्या कुटुंबाविषयी फार कमी माहिती समोर येत असते. मुळात तब्बू तिची खासगी आणि व्यावसायिक आयुष्य वेगळंच ठेवणं पसंत करते. पण तुम्हाला माहिती आहे का ? तब्बूप्रमाणे तिची मोठी बहिणसुद्धा एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे,फराह नाझ.
यश चोप्रा यांच्या ‘फासले’ सिनेमातून फराहने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.‘फासले’ सिनेमानंतर ती ‘मरते दम तक’, ‘नसीब अपना अपना’, ‘लव्ह 86’, ‘इमानदार’, ‘घर घर की कहानी’ अशा बर्याच सिनेमांमध्ये झळकली आहे. पण, 2005 मध्ये लग्नानंतर फराह बॉलिवूडपासून दूर जात संसारात रमली.फराह दिसायला तब्बूपेक्षा सुंदर दिसते. फराह आज बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी आजही तिचे चाहते तितकेच तिच्यावर प्रेम करतात. फरहाच्या लूकमध्ये काळानुसार बदल झाला असला तरी आजही ती तितकीच सुंदर दिसते.
फराहचे पहिले लग्न विंदू दारा सिंहसोबत झाले होते. हे लग्न केले तेव्हा फराह यशाच्याशिखरावर होती तर विंदू इंडस्ट्रीत चांगल्या संधीच्या शोधात होता. दोघांनी काही काळ डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दारासिंह यांना मात्र या दोघांचे लग्न अजिबात मान्य नव्हते. दोघांचे लग्न फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या ७ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.विंदू दारा सिंहपासून घटस्फोट घेतल्यानंतर फराहने सुमित सहगलशी लग्न केले. सुखाने दोघांचा संसार सुरु आहे. दोघेह मुंबईतच राहतात. सुमितची डबिंग कंपनी आहे. फरासुद्धा याच डबिंग कंपनीत काम करुन पतीची मदत करते. फराह आणि सुमितला एक मुलगाही आहे.