Join us

आईच्या कडेवर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आहे दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:14 IST

Marathi actress: तिचा हा लहानपणीचा फोटो पाहिल्यावर ती नेमकी कोण असावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी कायम नवनवीन शक्कल लढवत असतात. त्यामुळे कधी ते प्रोफेशनल लाइफ शेअर करतात तर कधी पर्सनल. यात खासकरुन ही कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान किस्से, प्रसंगही चाहत्यांसोबत शेअर करतात. यात बऱ्याचदा त्यांच्या बालपणीचे फोटो वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ यांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक अभिनेत्री तिच्या आईच्या कडेवर बसली असून ती देवदर्शन करत आहे. तिचा हा लहानपणीचा फोटो पाहिल्यावर ती नेमकी कोण असावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण, तिच्या बालपणीचा फोटो आणि आताचा तिचा लूक यांच्यात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांना तिला ओळखणं कठीण झालं आहे.

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मयुरी देशमुख ( Mayuri deshmukh) आहे.  खुलता कळी खुलेना या गाजलेल्या मालिकेत मानसी ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. मयुरीने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. इमली या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. मयुरीने डॉ. प्रकाश बाबा आमटे या मराठी सिनेमातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मयुरी देशमुखटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा