सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकारांच्या बालपणींचे फोटो पाहायला मिळतात आणि त्यांचे हे फोटो व्हायरलही होतात. दरम्यान आता असाच एका मराठमोळ्या कलाकाराच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत त्याच्या हातात खेळण्यातील बंदुक पाहायला मिळत आहे. या चिमुकल्याला ओळखलंत का? हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून मराठमोळा श्रेयस तळपदे आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि आवाजासाठी ओळखला जातो. पुष्पा या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेचे हिंदी डबिंग श्रेयसने स्वतः केले आहे. पुष्पाचा आवाज बनल्याने श्रेयसची फॅन फॉलोइंग दुप्पट झाली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे. इकबाल या चित्रपटातून श्रेयसला खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. श्रेयसला कोणतेही पात्र, गंभीर, ॲक्शन किंवा कॉमेडी दिलेले असले तरी तो त्यात एंट्री करतो आणि तो अगदी चोख बजावतो.
श्रेयस तळपदे याने २७ जानेवारीला त्याचा ४८वा वाढदिवस साजरा केला. एकेकाळी श्रेयसकडे सँडविच घेण्यासाठी पैसे नव्हते, तर आज श्रेयसकडे करोडोंचे घर आणि महागड्या कार आहेत. सीए नॉलेज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, श्रेयस तळपदे ४५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. एका चित्रपटासाठी तो २-३ कोटी रुपये घेतो. याशिवाय तो अनेक ब्रँड्सना एंडोर्स करतो. श्रेयसने बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटांमध्येही नाव कमावले आहे. श्रेयसच्या मासिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर तो ३० लाखांपेक्षा जास्त कमावतो.
महागड्या गाड्यांची आहे आवडश्रेयस तळपदेकडे Audi Q9 आहे. त्याला त्याची कार खूप आवडते. ही त्याची सर्वोत्तम कार आहे. हे मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. घराबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस तळपदेची मुंबईत २-३ घरे आहेत.
वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस तळपदेकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. तो लवकरच कंगना राणौतसोबत 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय तो अक्षय कुमारसोबत वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे.