Join us

'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंह यांचं एका भागाचं मानधन माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 14:01 IST

कपिलच्या शोसाठी अर्चना पूरन सिंह यांना मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे.

आपल्या भारदस्त आवाजाने आणि हसण्याने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरन सिंह. अर्चना गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. त्यांनी मेहनतीच्या जोरावर हिंदी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केले आहे. याशिवाय त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोसाठी अर्चना पूरन सिंहला किती मानधन मिळते, हे जाणून घेऊया. 

कपिलच्या शोसाठी अर्चना पूरन सिंह यांना मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे. कपिलच्या शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसून हसण्यासाठी अर्चना लाखो रुपये घेतात. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार एका एपिसोडसाठी अर्चना पूरन सिंह 10 लाख रुपये मानधन घेतात. अर्चना यांनी झी टीव्हीवर 1993 मध्ये सुरू झालेल्या "वाह क्या सीन है" मधून करिअरची सुरुवात केली होती. त्यांचा हा कार्यक्रम त्या वर्षीचा टीव्हीवरील सर्वाधिक हिट शो ठरला होता. यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

अर्चना यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांचा मुंबईतील मड आयलंडमध्ये मोठा बंगला आहे, ज्यामध्ये त्या कुटुंबासह राहतात. अर्चना यांचा पती परमीत सेठी अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. अर्चना आणि परमीत यांना दोन मुले आहेत. तर कामाबद्दल बोलायचं झालं तर अर्चना लवकर  'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा कॉमेडी शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 मार्च पासून सुरू होणार आहे. शोचा पहिला भाग ३० मार्च रोजी प्रसारित होणार आहे.   

टॅग्स :अर्चना पूरण सिंगसेलिब्रिटीबॉलिवूड