बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान नुकतेच करिश्माने तिची आई बबिता यांना ७४व्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर करून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बबिता यांची मोठी लेक करिश्मा कपूर हिने तिच्या बालपणातील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत बबिता करिश्मासोबत खेळत आहे. फोटो शेअर करून करिश्माने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले की, "तू हजार वर्षे जग, ही माझी इच्छा आहे... आम्हाला रोज तेच हवे आहे.
१९४८ साली जन्मलेल्या बबिता यांनी ७० आणि ८०च्या दशकात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजेश खन्ना यांच्या 'राज' या चित्रपटाद्वारे त्यांनी डेब्यू केल्यानंतर अनेक चित्रपटात एकत्र केले. ज्यात 'हसीना मान जायेगी', 'जीत', 'डोली' आणि 'एक हसीना दो दिवाने' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, रणधीर कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांनी १९७१ मध्ये लग्नगाठ बांधली. १९७४ मध्ये करिश्मा आणि १९८१ मध्ये रणधीर आणि बबिता यांना दुसरी मुलगी करीना झाली.
करीना बॉलिवूडमध्ये खूप सक्रीय आहे. पण करिश्मा फारशी इंडस्ट्रीत सक्रीय नाही. करिश्माने नुकतीच तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती ब्राउनमधून कमबॅक करते आहे. शेवटची ती मेंटलहूड या सीरिजमध्ये पाहायला मिळाली होती.