Join us

फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? प्रेग्नंसीमध्ये सहन केलं मोठं दु:ख ,आज आहे एका मुलीची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:46 IST

Actress: या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमध्ये अनेक अडचणी आल्या. ज्यामुळे तिने तिच्या जुळ्या बाळांपैकी एका बाळाला कायमच गमावलं.

सध्याचा काळ हा समाजमाध्यमांचा आहे त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो. यात अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात काही वेळा ही कलाकार मंडळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. म्हणूनच, बऱ्याचदा ते बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसातील फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आहे. या अभिनेत्रीने छोटो पडदा गाजवला असून सध्या ती तिच्या लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. मात्र, या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमध्ये अनेक अडचणी आल्या. ज्यामुळे तिने तिच्या जुळ्या बाळांपैकी एका बाळाला कायमच गमावलं. अलिकडेच तिने याविषयी खुलासा केला.

माही विजने दिला होता जुळ्या मुलांना जन्म; दोघांपैकी गमावलं एक नवजात बाळ

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माही विज आहे. सोशल मीडियावर माही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिने हा फोटो शेअर केला आहे. माहीने शाळेत असताना तिचं पहिलं फोटोशूट केलं होतं. त्याच पोर्टफोलिओमधला हा तिचा फोटो आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिला ओळखणं अनेकांना कठीण झालं आहे.

दरम्यान, या फोटोमध्ये माही कमालीची बारीक असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेकांनी तिला ओळखलं नाही. तिच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. माहीने कलाविश्वापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या लेकीसोबत तारासोबत वेळ घालवते. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीजय भानुशाली