१९८९ साली 'धरलं तर चावतंय' हा धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिटही ठरला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रिया बेर्डे, अलका कुबल, रेखा राव, विजय पाटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अश्विनीची भूमिका अभिनेत्री रेखा राव यांनी साकारली होती. या चित्रपटातून रेखा राव यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. रेखा राव सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहेत आणि आता त्यांना ओळखणं कठीण झाले आहे.
बालपणापासूनच रेखा राव यांना डान्सची आवड होती. किशोर कुमार यांच्यासमोर परफॉर्म करण्याची संधी त्यांना मिळाली होती. या संधीचे रेखा यांनीही सोने केले आणि त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली.
डान्सप्रमाणे अभिनयाची देखील आवड त्यांच्यात निर्माण झाली. अनेक ऑफर्स त्यांना मिळाल्या. 'धरलं तर चावतंय', 'प्रेम करूया खुल्लमखुल्ला', 'शुभ मंगल सावधान', 'आमच्यासारखे आम्हीच' या लोकप्रिय ठरलेल्या मराठी सिनेमात त्यांनी काम केले. मराठी रुपेरी पडदा गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले.यात 'हम दिल दे चुके सनम', 'तेहजीब' , 'हिरोज' या चित्रपटांचा समावेश आहे.