भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित बबन हा मराठी चित्रपट २०१८ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. बहुतेक चित्रपटाच्या कलाकारांची निवड ही ऑडिशनमधून केली जाते मात्र गायत्री जाधवच्या बाबतीत वेगळेच काहीतरी घडले आणि तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
अभिनेत्री गायत्री जाधव तिच्या आई सोबत चित्रपट पाहायला चालली होती. रस्त्याने जात असताना दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची नजर गायत्रीवर पडली आणि बबन चित्रपटाच्या नायिकेसाठी तिची निवड करण्यात आली.
बबन चित्रपटाने आणि त्यातील गाण्यातून गायत्रीला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाशिवाय गायत्री आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटाचे नाव होते राजकुमार.
राजकुमार हा चित्रपट १६ जुलै २०२१ रोजी युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. थिएटर बंद असल्यामुळे केवळ मराठी चित्रपट पुढे यावा याच हेतूने चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता.
सध्या ती आपल्या कुटुंबासोबत पुण्यातच वास्तव्याला आहे. गायत्री विवाहबद्ध झाली असली तरी आणखी कुठला प्रोजेक्ट तिला मिळाला तर ती निश्चितच त्यात काम करेल.