Join us

'लकडी की काठी..' या लोकप्रिय गाण्यातील मिनी आठवतेय ना?, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 6:00 AM

१९८३ साली रिलीज झालेला चित्रपट मासूममधील लकडी की काठी, काठी का घोडा या लोकप्रिय गाण्यातील बालकलाकार मिनी सध्या काय करतेय, हे जाणून घेऊयात.

१९८३ साली रिलीज झालेला चित्रपट मासूममधील लकडी की काठी, काठी का घोडा हे गाजलेले गाणे आजही अनेकांच्या ओठावर रुळताना दिसते. या गाण्यात जुगल हंसराज, उर्मिला मातोंडकर आणि आराधना श्रीवास्तव हे बालकलाकार झळकले होते.

जुगल हंसराज याने राहुल, उर्मिला मातोंडकरने पिंकी तर आराधना श्रीवास्तवने मिनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. या चित्रपटातील उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज हे कलाकार आजही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र या चित्रपटात मिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आराधना श्रीवास्तव मात्र सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. 

मासूम चित्रपटातली मिनी म्हणजेच बालकलाकार आराधना श्रीवास्तव ही बालकलाकार म्हणून आजही चांगलीच परिचीत आहे. तिने मासूम व्यतिरिक्तखुदा हाफिज, राम तेरे कितने नाम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. तिचे या चित्रपटातील कामाचे खूप कौतुक झाले होते.

मात्र कालावधीनंतर आराधनाने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. दरम्यान काही कालावधीपूर्वी एका मुलाखतीत आराधनाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. तिने सांगितले की, बॉलिवूडच्या या दोन तीन चित्रपटानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कानपूरला गेले होते. तिथून पुढे पुण्यातील सिम्बॉइसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आणि आयटी क्षेत्रात नोकरीही केली. गायनाची आवड तिला पहिल्यापासूनच होती त्यामुळे यात तिने मास्टर्स आणि पीएचडी करण्याचे ठरवले.

आराधनाचे लग्न झाले असून तिला एक मुलगी आहे. जिचे नाव यशेता आहे. ती जेव्हा ५ वर्षांची होती तेव्हा तिने आपल्या लाडक्या लेकीसाठी ‘लकडी की काठी…’ हे गाणे गाऊन तिला खुश केले होते. त्यावेळी मिडियासोबत तिने गिटार वाजवतानाचा हा फोटो शेअर केला होता. आज इतक्या वर्षानंतर आराधना श्रीवास्तव बॉलिवूडपासून खूप दूर असली तरी गायनाची आवड ती आजही जोपासताना दिसत आहे.

टॅग्स :उर्मिला मातोंडकर