२००८ साली रिलीज झालेला चित्रपट 'दे धक्का' सुपरहिट ठरला. हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसेच त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि त्याला मकरंद अनासपुरेचा गावरान बाज रसिकांना भावला. याशिवाय शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. मेधा मांजरेकर यांनी साकारलेली सुमीची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली. आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आई मेधा मांजरेकर यांनी उत्तमरित्या साकारली.
मेधा मांजरेकर यांनी याशिवाय बऱ्याच चित्रपटात विविध भूमिका केल्या आहेत. त्यांच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चाहते नेहमीच पसंती देत असतात. खऱ्या आयुष्यात मेधा मांजरेकर खूप ग्लॅमरस आहेत.
मेधा मांजरेकर यांनी दे धक्का चित्रपटाशिवाय फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, नटसम्राट, बंध नायलॉनचे या चित्रपटात काम केले आहे. तसेच दबंग ३ या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. नटसम्राटमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती.
खऱ्या आयुष्यात त्यांची पहिली भेट जवळपास २० वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून मेधा यांना भेटले होते.पहिल्याच भेटीत महेश मांजरेकर मेधा यांच्या प्रेमात पडले होते आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. नंतर त्यांनी लग्न केले. या दोघांचे हे दुसरे लग्न आहे.
या दोघांना सई, अश्वामि या २ मुली आहेत तर सत्या नावाचा एक मुलगा आहे. तर गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील ते आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात.