Join us  

करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमूरचे व्हेकेशनचे फोटो तुम्ही पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 2:01 PM

सैफची बहीण सोहाने सोशल मीडियावर सगळ्यांचा फोटो शेअर करून त्यांच्या हॉलिडे बाबत सांगितले आहे. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सैफ, करिना, कुणाल, सोहा, इनाया आणि तैमूर स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

सैफ अली खान आणि करिना कपूर हे दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते वेळात वेळ काढून आपल्या मुलासोबत नेहमीच वेळ घालवतात. ते सध्या मालदीवमध्ये असून त्यांच्यासोबत सैफची बहीण सोहा अली खान तिचा पती कुणाल खेमू आणि त्यांची मुलगी इनाया देखील आहे. सैफची बहीण सोहाने सोशल मीडियावर सगळ्यांचा फोटो शेअर करून त्यांच्या हॉलिडे बाबत सांगितले आहे. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सैफ, करिना, कुणाल, सोहा, इनाया आणि तैमूर  स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. मेक अ स्पलाश असे कॅप्शन देखील तिने या फोटोसोबत दिले आहे. 

सोहाने यासोबतच आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत इनाया आणि तैमूर काही चित्र रंगवताना दिसत आहेत. तैमूरसोबत करिना दिसत असून कुणालने इनायाला मांडीवर घेतले आहे. या सोबत कलर मी हॅपी असे सोहाने लिहिले आहे. या दोन्ही फोटोवर या कलाकारांच्या फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हजारोहून लोकांनी या फोटोला लाइक केले आहे.

करिनाच्या फॅन क्लबने देखील करिना, सैफ आणि तैमूरच्या हॉलिडेचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये सैफ अली खान इअर फोन लावून काहीतरी ऐकताना दिसत होता तर तैमूर समुद्राकडे पाहून खूश होत असल्याचे दिसले होते. या फोटोत करिना आणि तैमूर दोघांनीही पांढरे कपडे घातले आहेत तर सैफने ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट घातला होता.

 

सैफ अली खान लवकरच त्याच्या सिक्रेट गेम्स या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या वेबसिरिजचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. तसेच बाजार या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण देखील लवकरच सुरू होणार आहे. तर करिना करण जोहरच्या तख्त या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती लवकरच सुरुवात करणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान सोहा अली खानकुणाल खेमू