Join us

महिला डॉक्टर ‘नशेबाज, नशेडी’ म्हणाली; आर. माधवनने बोलती बंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 3:30 PM

आर. माधवनला एका कथित महिला डॉक्टरने असाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण माधवनने तिला असे काही उत्तर दिले की, तिची बोलती बंद झाली.

ठळक मुद्देआर. माधवनच्या या उत्तरानंतर त्याचे चाहतेही मैदानात उतरले. या चाहत्यांनी माधवनची बाजू घेत, जोरदार किल्ला लढवला.

बॉलिवूड स्टार्ससाठी ट्रोलिंग नवे नाही. बॉलिवूड अभिनेता आर. माधवनला एका कथित महिला डॉक्टरने असाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण माधवनने तिला असे काही उत्तर दिले की, तिची बोलती बंद झाली. या महिला डॉक्टरने काय केले तर माधवनला थेट नशेबाज म्हणून डिवचले. तर याची सुरुवात झाली अभिनेता अमित साध याने माधवनसोबत एक फोटो शेअर केला.‘भाई, मॅडी सर, तुम्ही मला त्या 30 मिनिटांत पुन्हा प्रेरणा दिली. तुझ्यावर खूप प्रेम करतो भावा,’ असे लिहित अमितने माधवनसोबतचा फोटो शेअर केला.

 हा फोटो पाहून अनुष्का भंडारकर नामक एका युजरने का कुणास ठाऊक माधवनला लक्ष्य केले.  ‘मॅडी कधी काळी माझा जीव की प्राण  होता. पण आता त्याला दारू, नार्को ड्रग्जच्या आहारी जात स्वत:चे करिअर, आयुष्य उद्ध्वस्त करताना पाहणे निराशाजनक आहे. रहना है तेरे दिल में या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा तो कळीसारखा फ्रेश होता. आता पाहा. त्याचा चेहरा, त्याचे डोळे सगळे काही सांगतात...,’ असे अनुष्का भंडारकर नाम या युजरने लिहिले. ही अनुष्का डॉक्टर आहे. स्वत:च्या बायोमध्ये तिने याची माहिती दिली आहे.अनुष्काने ही कमेंट केली आणि आर. माधवनची नजर नेमकी तिच्या या कमेंटवर गेली. त्याने यावर असे काही उत्तर दिले की, अनुष्काची बोलती बंद झाली. 

‘ओह, तर हे आहे तुझे डायग्नोसिस? तुझ्याकडे येणा-या रूग्णांबद्दल खरोखर काळजी वाटतेय. कदाचित तुला स्वत:लाच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.’

आर. माधवनच्या या उत्तरानंतर त्याचे चाहतेही मैदानात उतरले. या चाहत्यांनी माधवनची बाजू घेत, जोरदार किल्ला लढवला.माधवनने बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपली ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी माधवन व्यक्तीमत्त्व विकास अर्थात पर्सनालिटी डेव्हल्पमेंटचे क्लासेस घ्यायचा. ‘रहेना हैं तेरे दिल में’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.पहिल्याच सिनेमातील आपल्या अभिनयाने माधवनने रसिकांची मने जिंकली. याशिवाय थ्री इडियट्स, रंग दे बसंती, दिल विल प्यार व्यार, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्नस, गुरु अशा विविध सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. शांती शांती शांती, एन्नावले, कन्नाथिल मुथामित्तल अशा कितीतरी दाक्षिणात्य सिनेमातही माधवनने भूमिका साकारल्या आहेत.  

टॅग्स :आर.माधवन