Zara Phythian Sentenced Jail: हॉलिवूड सिनेमा 'डॉक्टर स्ट्रेंज' (Doctor Strange) ची अभिनेत्री Zara Phythian वादात अडकली आहे. आरोप आहे की, जाराने पती विक्टर मार्कसोबत मिळून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं होतं. याप्रकरणी कोर्टाने जाराला तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच अभिनेत्री पती विक्टर मार्क यालाही कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जाराने पती विक्टरसोबत मिळून १३ वर्षीय एका मुलीचं १४ वेळा लैंगिक शोषण केलं होतं. तसेच विक्टरने २००२ ते २००३ दरम्यान १५ वर्षीय एका दुसऱ्या मुलीचं ४ वेळा लैंगिक शोषणासारखं घाणेरडं काम केलं होतं. कोर्टाने याप्रकरणी जाराला ८ वर्ष आणि तिचा पती विक्टरला १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
सोबतच कोर्टाने असंही सांगितलं की, Zara Phythian आणि Victor Marke आता लहान मुलांसोबत कधी काम करू शकणार नाहीत. पीडितेने कपलवर आरोप लावला की, दोघांनी मिळून तिचा दारू पाजली आणि तिचं लैंगिक शोषण केलं. पीडितेला त्यावेळी समजत नव्हतं की, तिने कशाप्रकारे या दोघांपासून स्वत:चा बचाव करावा.
Zara Phythian आणि तिचा Victor Marke त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले. पण कोर्टाने दोघांनाही दोषी ठरवत तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. जारा आणि विक्टर यांनी जेव्हा मुलींचं शोषण केलं होतं तेव्हा दोघांचं लग्न झालेलं नव्हतं.
दरम्यान Zara Phythian ने साल २०१६ मध्ये 'डॉक्टर स्ट्रेंज' (Doctor Strange) सिनेमात ब्रनेट जीलोटची भूमिका साकारली होती. या सिनेमात Benedict Cumberbatch मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर जारा 'ट्राइबल गेट आउट अलाइव' या २०२० साली आलेल्या सिनेमातही दिसली होती. तसेच ती नुकत्याच रिलीज झालेल्या Accident Man 2 मध्येही होती.