बॉलिवूडमध्ये 'डॉन'च्या नव्या युगाला सुरुवात होत आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) नावाची घोषणा करत शाहरुख खान (Shahrukh Khan) बाहेर गेल्याचं समोर आलं. यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. नंतर रणवीर सिंगचा प्रोमो रिलीज झाला आणि नेटकऱ्यांमध्ये विभागणीच झाली. शाहरुख खान नाही तर डॉन नाही अशा अनेक प्रतिक्रिया यायल्या लागल्या. आता 'डॉन 3' (Don 3) च्या टीझरखालील अनेक प्रतिक्रिया डिलीट करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
'नो शाहरुख खान नो डॉन' हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. रणवीर सिंहला 'डॉन'च्या रुपात स्वीकारायला चाहते लवकर तयार नाहीयेत. त्यामुळे टीझर व्हिडिओखाली अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कित्येक निगेटिव्ह कमेंट्सही आल्या आहेत. शिवाय ट्विटरवर दोन फोटो व्हायरल होत आहेत.
पहिल्या फोटोत 51 लाख व्ह्यूज, 98 हजार लाईक्स आणि 1 लाखाच्यावर डिसलाईक्स दिसत आहेत. तर 37 हजार कमेंट्स केले आहेत.
दुसऱ्या फोटोत 60.77 लाख व्ह्यूज, 1.09 लाख लाईक्स आणि 1.21 डिसलाईक्स आहेत. तर कमेंट्सची संख्या मात्र कमी होऊन ३३ हजार झाली आहे. याचाच अर्थ ४ हजार कमेंट्स डिलीट केल्याचं स्पष्ट दिसतंय.
याच फोटोंच्या आधारावर नेटकऱ्यांनी सिनेमाच्या मेकर्सवर कमेंट्स डिलीट केल्याचा आरोप केलाय. तसंच फरहान अख्तर डॉन फ्रँचायझीचा दिग्दर्शक, निर्माता आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. या सगळ्यावर शाहरुखचे चाहते प्रचंड नाराज झालेत.'पठाण'च्या यशानंतर फरहानने जाणूनबुजून 'डॉन 3'ची घोषणा केल्याचं नेटकरी म्हणत आहेत.कित्येक दिवस फरहानने 'डॉन 3' ची स्क्रिप्ट तयार नसल्याचं सांगितलं होतं. मग अचानक ही घोषणा कशी केली असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 'डॉन 3' 2025 मध्ये रिलीज होणार आहे.