Join us

‘सर’ म्हणू नका, मला ‘ओय सोनू’ म्हणा; सोनू सुदने पुन्हा जिंकले चाहत्यांचे मन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 7:11 PM

सोनू सूदच्या या नि:स्वार्थ कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. शनिवारी सोनू सूदने राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनीही सोनू सूदच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

अभिनेता सोनू सूद सध्या तो करत असलेल्या मदतकार्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. स्थलांतरितांची तो जी मदत करत आहे. त्यामुळे तो आता त्यांचा ‘रिअल हिरो’ बनलाय. तो पडद्यावरचा व्हिलन असला तरीही आमच्या हृदयातील हिरो असल्याचे चाहते सांगत आहेत. आता त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्याने ट्विटरवर  एका चाहत्याला सांगितले, ‘मला सर ऐवजी, ‘ओय सोनू’ म्हणा, मला ते जास्त आवडेल.’ 

सोशल मीडियावर सोनू सूद हा चांगलाच अ‍ॅक्टिव्ह झालाय. तो चाहत्यांच्या अगदी साध्यासुध्या प्रश्नांचीही तेवढ्याच आस्थेने उत्तरे देत आहे. नुकत्याच एका टिवटरवरील सेशनमध्ये नेटकऱ्याने सोनू सूदला आता यापुढे सोनू सर म्हणा, असं ट्विटरवर म्हटलं. त्यावर सोनू सूदने नेटकऱ्याला उत्तर देत म्हटलं, ‘सर म्हटल्यावर नातं दूरचं होतं. मला ‘ओय सोनू’ असं म्हटलं तरी चालेल.’ सेलिब्रिटी असून सुद्धा सोनू सूदने सर्वसामान्यांप्रमाणे वावरून, त्यांची मदत करून खऱ्या  आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे.

जोपर्यंत मी शेवटच्या स्थलांतरिताला घरी पोहोचवणार नाही, तोपर्यंत मदतकार्य सुरूच ठेवेन, असे आश्वासन त्याने लोकांना दिलं आहे. सोनू सूदच्या या नि:स्वार्थ कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. शनिवारी सोनू सूदने राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनीही सोनू सूदच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

टॅग्स :सोनू सूदमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस