Join us

नाटय़ पडद्यावरचं अन् पडद्याआडचं..

By admin | Published: November 27, 2014 1:25 AM

पिंजरसारखा मनाला भेदून जाणारा चित्रपट अशा उत्कट कलाकृतींमागचा सिद्धहस्त लेखक-दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा ‘ङोड प्लस’ चित्रपट राजकीय विडंबन, उपहास आहे,

उलगडला चित्रपटाचा प्रवास : ‘ङोड प्लस’च्या कलाकारांची लोकमत कार्यालयास भेट
चाणक्यसारखी यादगार मालिका, मृत्युंजयसारखी कर्णाच्या जीवनावरची मालिका, पिंजरसारखा मनाला भेदून जाणारा चित्रपट अशा उत्कट कलाकृतींमागचा सिद्धहस्त लेखक-दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा ‘ङोड प्लस’ चित्रपट राजकीय विडंबन, उपहास आहे,  येत्या 28 नोव्हेंबरला ‘ङोड प्लस’ प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील कलाकारांच्या चमूला घेऊन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली. चंदेरी विश्वाची यानिमित्ताने झाडाझडती झाली आणि ‘ङोड प्लस’बद्दल गप्पागोष्टीही..
 
पूजा सामंत ल्ल मुंबई
देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह असते. पंतप्रधानपदी असलेल्या इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनी केली आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. ङोड प्लस म्हणजे सुरक्षेचं अतिमहत्त्वाचं कवच. ही ङोड प्लस सुरक्षा देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच मिळते.
‘ङोड प्लस’च्या कथेचं संक्षिप्त स्वरूप सांगत डॉ. द्विवेदींनी माहिती दिली. लेखक-पत्रकार रामकुमार सिंग यांच्या कथेवर पटकथा-संवादाचा बाज डॉ. द्विवेदी यांनी चढवला. कथा घडते राजस्थानमधील एका छोटय़ा शहरात -मंडावामध्ये. देशाचे पंतप्रधान हवालदिल आहेत, कारण सरकार कधीही कोसळेल असा त्यांना फोन येतो. शासन आणि खुर्ची वाचवायची तेव्हा बिथरलेले पंतप्रधान फतेहपूर येथे असलेल्या दग्र्यात जाऊ न चादर चढवावी, अशी चमत्काराची आशा उरी बाळगत पंतप्रधान आपल्या सुरक्षारक्षकांच्या फौजफाटय़ासह दग्र्यातील कबरीवर चादर चढवण्यास जातात, पण त्यांच्या आगमनाच्या खबरीने त्या छोटय़ाशा मरगळलेल्या गावात कोण चैतन्य पसरतं. गावात ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय. पंतप्रधानांचा लवाजमा तिथे पोहोचतो आणि गावातील एक सामान्य माणूस अस्लम पंक्चरवाला पंतप्रधानांकडे कैफियत मांडतो. गंमत अशी की, चमत्कार घडतो आणि पडणारं सरकार वाचतं. ंपंतप्रधानांचा दग्र्यावरचा विश्वास अधिकच वाढतो. (पंतप्रधानांच्या भूमिकेत कुलभूषण खरबंदा) सरकार वाचतं आणि पंक्चरवाल्या अस्लमच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडतो. तो बदल म्हणजे अस्लमला चक्क ङोड प्लस सुरक्षेचे कवच मिळते, जे फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच मिळते. पंतप्रधानांना अस्लमसारख्या सामान्य माणसाने असे कोणते रहस्य-कसली तक्रार केली असावी, ज्यामुळे अस्लमला ङोड प्लस सुरक्षा तर मिळतेच, ज्याने त्याची दशा आणि दिशा पार ढवळून निघते.
फिल्मी दिखाऊ डामडौलापासून कायमच दूर राहणारे डॉ. द्विवेदी हसत म्हणतात, हिंदी सिनेमातील पडद्यावरच्या कलाकारांना आताशा नेहमीच बंगल्यात-हवेलीत राहताना आपण पाहतो, पण ते कधीही नोकरी-व्यवसाय करताना दाखवले जात नाहीत. पण ‘ङोड प्लस’मधील व्यक्तिरेखा पोटापाण्याचा व्यवसाय करताना दिसतात. 
लाइफ ऑफ पाय, इंग्लिश-विंग्लिश (श्रीदेवीच्या पतीच्या भूमिकेत), लुटेरासारखे ऑफ बीट सिनेमा करणारा कलावंत आदिल हुसेनने अस्लम पंक्चरवाल्याची व्यक्तिरेखा साकारलेली आहे, तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत टीव्ही अभिनेत्री ‘जस्सी’फेम मोना सिंग आहे. अभिनेत्री हृषिता भट्ट आणि गायक सुखविंदर सिंग दोघंही सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. अन्य महत्त्वाच्या भूमिकेत मुकेश तिवारी ज्याने हबीबची व्यक्तिरेखा साकारली असून तो अस्लमचा शेजारी आहे. राहुल सिंगने ङोड प्लस सुरक्षेच्या प्रमुखाची भूमिका तर संजय मिश्रने हिदायतुल्ला या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाची भूमिका केली आहे. मुकुंद पुरोहित आणि मंदिरा कश्यप यांची निर्मिती आहे.
आपल्या कारकिर्दीचा आरंभ रंगभूमीपासून करणा:या आदिल हुसेनने काही काळ स्टॅण्ड-अप कॉमेडियनचे काम केले, आदिल हुसेन आणि मोना सिंग यांना ङोड प्लसमध्ये काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करून गेला. मुकेश तिवारी गुणी कलावंत, तोही डॉ. द्विवेदींच्या स्वभावाचा, प्रतिभेचा चाहता. मुकेशने आवजरून सांगितलं, मी माङया आजवरच्या कारकिर्दीत शे-दोनशे सिनेमे केलेत, पण माङया यादगार भूमिकांमध्ये ङोड प्लस कायम राहील. 
डॉ. द्विवेदी प्रत्येक कलाकार आणि त्याच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देतात. कारण ते सिनेमा माध्यमावर-इतिहासावर प्रेम करणारे आहेत.
 
द्विवेदींच्या कारकिर्दीतले अनुभव फिल्मी जीवनातले जळजळीत वास्तव उघड करतात. एखाद्या चांगल्याशा कथेवर तडजोड न करता सिनेमा करावा असा विचार  केला, तेव्हा फायनान्सर्स मिळाले नाहीत. ज्यांनी पैसा देऊ केला, त्यांनी अटी लादल्या. त्यांच्या मर्जीतल्या कलाकारांची निवड असो वा नसो. संबंध न बिघडवता सुसंस्कृत माणसासारखा मी मागील दरवाजाने तिथून एक्ङिाट घेतली. ङोड प्लससाठी मी अजूनही कुणाचे मानधन दिलेले नाही.  चांगली कलाकृती निर्माण करायची असल्यास कलाकाराचे सहकार्य हवे जे ‘ङोड प्लस’च्या कलाकारांनी दिले.