Join us

ड्रीम गर्ल 2 स्टार अनन्या पांडेने सांगितला रक्षाबंधन सणाचा अर्थ, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 19:53 IST

अभिनेत्री अनन्या पांडेचा रक्षाबंधनाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरला झाला आहे.

आज देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जात आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर आपल्या प्रेमाची राखी बांधत आहे. यातच अभिनेत्री अनन्या पांडेचारक्षाबंधनाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरला झाला आहे.  या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

व्हिडिओमध्ये अनन्या पांडे तिचा भाऊ अहान पांडेसोबत रक्षाबंधनाचा अर्थ सांगताना दिसत आहे. अनन्या पांडे म्हणते की, रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध, त्यामुळे याचा अर्थ रक्षाबंधन आहे. अनन्याने आपल्या भावासोबत लहानपणीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अनन्या आणि अहान खूपच क्यूट दिसत आहे.

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा ड्रीम गर्ल २ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. ज्याला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने पाच दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर आगामी काळात ही कमाई वाढण्याची शक्यता आहे.

अनन्या पांडेने २०१९ साली आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत करीअरची सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. अनन्याने आत्तापर्यंत 'स्टूडंट ऑफ़ द ईयर २’, ‘खाली पीली’, ‘पति पत्नी और वो’, ‘गहराइयां’ आणि 'लाइगर' अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. सध्या अनन्या, अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. 

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडसिनेमारक्षाबंधन