Join us

'ढगाला लागली कळ.....' वर आयुषमान खुराणा आणि नुसरतसोबत थिरकणार हा मराठमोळा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:43 PM

आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे या गाण्यात प्रेक्षकांना रितेश देशमुखला देखील पाहायला मिळणार आहे. रितेश या चित्रपटात केवळ या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यावर नृत्य सादर करण्यासाठी रितेश खूपच उत्सुक आहे.

दादा कोंडकें यांचे ढगाला लागली कळ... हे गाणे आज इतक्या वर्षांनंतरही तितकेच प्रसिद्ध आहे. या गाण्यावर ताल धरायला सगळ्यांनाच आवडतो. आता या गाण्याची भुरळ बॉलिवूडला देखील पडली आहे. आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे.

आयुषमान खुराणा सध्या त्याच्या ड्रीम गर्ल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या ट्रेलरमध्ये आयुषमानचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. राधे राधे या गाण्यावर थिरकल्यानंतर आता तो ढगाला लागली कळ... या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. 

ड्रीम गर्ल या गाण्यासाठी खास ढगाला लागली कळ या गाण्याचा रिमिक्स बनवण्यात आला आहे आणि या गाण्यावर आयुषमान आणि नुसरत थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रेक्षकांना रितेश देशमुखला देखील पाहायला मिळणार आहे. रितेश या चित्रपटात केवळ या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यावर नृत्य सादर करण्यासाठी रितेश खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, ढगाला लागली कळ... हे माझे प्रचंड आवडते गाणे आहे. या मुळ गाण्यात दादा कोंडके होते. या गाण्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

या गाण्यावर नृत्य सादर करायला मिळतंय हे ऐकूनच मी खूश झालो. नुसरत आणि आयुषमान हे दोघेही खूप चांगले डान्सर आहेत. मला त्या दोघांचा अभिनय देखील प्रचंड आवडतो. त्यांच्यासोबत या गाण्यावर डान्स करायला मिळणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तिला डान्स येत नाही, त्याने देखील हे गाणे ऐकले की आपोआप त्याचे पाय थिरकू लागतात. आजपर्यंत अनेकांनी या गाण्याचा रिमिक्स केला आहे. त्यातील काही रिमिक्स फसले. खरे तर रिमिक्स करताना मूळ गाण्याचा ताल, लय बदलणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. 

टॅग्स :आयुषमान खुराणारितेश देशमुखड्रिम गर्ल