Join us

महिमा मकवाणाचे बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या कोणतं आहे हे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 19:46 IST

अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे.

ठळक मुद्दे महिमा मकवाणा दिसणार सिंड्रेलाच्या अवतारात

स्टार प्लस वाहिनीवरील  ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेतील आपल्या सक्षम अभिनयाने १९ वर्षांच्या महिमा मकवाणाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेत ती मरियम ही प्रमुख भूमिका साकारते आहे. या मालिकेत महिमा मकवाणा आता मोठी झाली असून तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींमुळे ती खोट्‌या नावाने राहत आहे. आता फवाद आणि महिमा यांच्यातील रोमांसही जोर पकडू लागला असून ते दोघेही आलियाच्या बर्थडे पार्टीची तयारी करत आहेत.आलिया आपल्या वाढदिवसासाठी वेशभूषेच्या संकल्पनेवर आधारित पार्टी करणार आहे. यात महिमाचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ती राजकन्या बनणार असून ती निळ्‌या रंगाच्या गाऊनमध्ये सिंड्रेला बनेल आणि तिच्या डोक्यावर मुकुटही असेल.याबाबत महिमा म्हणाली, “सिंड्रेला माझी लहानपणापासून आवडती व्यक्तिरेखा असून मी तिच्यासारखीच तयार होणार आहे. माझे लहानपणीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तिचा पोशाख किती सुंदर आहे आणि तो परिधान करून मला खरेच राजकन्येसारखे वाटेल. मला माझा हा लूक खूपच आवडला आहे.”महिमाचा पोशाख खूपच छान झाला असून तिचा मेकअप आणि केशरचनासह हलकेफुलके दागिने असतील. एवढेच नाही तर फवाद यात ड्रॅकुलाचे रूप घेणार असून आपल्या लूक्स आणि जादूसह सगळ्‌यांचे मनोरंजन करणार आहे. प्रेक्षकांनाही महिमाचा हा लूक आवडेल याबद्दल शंकाच नाही!‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या मालिकेत महिमा मकवाणासोबत परस सिंग, रुक्सार रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :मरियम खान रिपोर्टिंग लाइव्हस्टार प्लस