Join us

‘डोंबिवली फास्ट’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती बिघडली, हैदराबादमध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:30 PM

निशिकांत कामतने 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

मुंबई : 'डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निशिकांत कामतला यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

निशिकांत कामतने 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला आहे.

दरम्यान, अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्याने दिग्दर्शन थांबवून फक्त अभिनेता म्हणूनच काम करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. तसेच, आगामी 'दरबार' या चित्रपटासाठी सध्या तो काम करत असून हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :निशिकांत कामतबॉलिवूड