उर्वशी रौतला सध्या पागलपंतीच्या शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती मात्र तिचा हा आनंद फारकाळ राहिला नाही. या मागचे कारण आहे पुलकित सम्राट त्याचे झाले असे की, सध्या पागलपंतीच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे.
उर्वशीच्या बर्थ डेच्या सिनेमाच्या पहिला शेड्यूलचे शूटिंग संपणार होते. त्यामुळे मेकर्सनी सेटवरच केक कापून सेलिब्रेशन करण्याचे ठरवले. या प्लॅनला घेईन उर्वशीदेखील एक्साइटेड होती. मात्र मेकर्सच्या या प्लॅनवर पुलकितने पाणी फेरले. त्यांने सेलिब्रेशनचा भाग बनण्यास नकार दिला. पुलकितसोबत कृति खरबंदादेखील नकार दिला. त्यामुळे मेकर्सनी सेलिब्रेशनचा प्लॅनच कॅन्सल केला.