Join us

खलनायकामुळे प्रसिद्ध झालो

By admin | Published: September 15, 2016 2:00 AM

दाक्षिणात्य अभिनेता कार्तिक जयराम ‘सिया के राम’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारत आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करीत असताना कार्तिक हिंदी इंडस्ट्रीत आला

दाक्षिणात्य अभिनेता कार्तिक जयराम ‘सिया के राम’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारत आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करीत असताना कार्तिक हिंदी इंडस्ट्रीत आला आणि त्याने येथे आपले चांगलेच बस्तान बसवले. आपल्या या प्रवासाविषयी कार्तिकने लोकमत सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...दक्षिणेकडे काम करीत असताना हिंदीइंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार कसाकेलास?- दक्षिणेकडे मी मालिकांमध्ये काम करीत होतो. माझी ‘अश्विनी नक्षत्र’ ही मालिका तिथे खूपच प्रसिद्ध होती. या मालिकेत मी साकारलेली जेकेची भूमिका तर खूप गाजली होती. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये बस्तान बसल्यानंतर मी हिंदीकडे कधी वळेन, असे मला वाटलेदेखील नव्हते. पण, मला लहानपणापासून रावण या व्यक्तिरेखेविषयी आकर्षण होते. त्यामुळे या मालिकेचे आॅडिशन मी द्यायचे ठरवले आणि आॅडिशन खूपच चांगले झाल्याने मी हिंदी इंडस्ट्रीचा भाग बनलो.हिंदीत काम करताना तुला कोणत्यागोष्टीवर अधिक मेहनत घ्यावी लागली?- इंडस्ट्री कोणतीही असो, एक कलाकार म्हणून आम्हाला केवळ अभिनय करायचा असतो. कलेला कोणत्याही भाषेचे बंधन नसते. त्यामुळे हिंदीत काम करणे काही वेगळे आहे, असे मला वाटले नाही. केवळ मी एका पौराणिक मालिकेत काम करीत असल्याने तिथे खूपच शुद्ध भाषा बोलावी लागते. या भाषेवर मला खूप मेहनत घ्यावी लागली.रावणाची भूमिका साकारणे तुझ्यासाठीकिती आव्हानात्मक होते?- माझ्या वेशभूषेचे एकूण वजन जवळजवळ २५ किलो असते. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी इतक्या वजनासह वावरणे हे खरे तर आव्हानात्मक असते. माझ्या मुकुटाचे वजनच ४-५ किलोे आहे. सुरुवातीला यामुळे माझे डोके दुखायचे; पण आता मला त्याची सवय झाली आहे. आता तर माझी ही भूमिका इतकी प्रसिद्ध झालीय, की लोक मला रावण म्हणूनच ओळखतात. माझ्या मित्रांची मुले मला ‘रावणकाका’ म्हणूनच हाक मारतात. या मालिकेत रावणाला दाढी असल्याचे तुम्हाला पाहायला मिळाले आहे. याची एक गंमतच आहे. मी माझ्या एका दाक्षिणात्य सिनेमासाठी दाढी वाढवली होती आणि त्यातच मी लूक टेस्ट दिली. माझा तो लूक आवडल्याने मालिकेतही माझी दाढी असेल, असा निर्णय घेण्यात आला.मालिकांचे चित्रीकरण हे अनेक तासांचे असते. तू मालिकांसोबतच अनेक दाक्षिणात्य सिनेमे करीत आहेस. त्यामुळे तुझे वेळापत्रक कसे सांभाळतोस?- माझ्या काही दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे, तर काही चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. त्यामुळे चित्रीकरणासाठी तसेच प्रमोशनसाठी मला वेळ द्यावा लागतो. सध्या या सगळ्यामुळे मी कामात प्रचंड व्यग्र आहे. त्यामुळे मी काम करणे एन्जॉय करीत आहे.