बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. रेखा यांचे व्यावसायिक जीवन जितके गाजले तितकेच त्यांचे खासगी जीवन वादग्रस्त ठरले. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसे माहित नाही. प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड आहे. रेखा यांचा हा जीवन प्रवास वर्णन करणारे पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहले आहे.रेखा- ऍन अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात यासिर यांनी रेखा यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आले . यापैकी एक खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणाऱ्या रेखा यांच्या जीवनातील हे रहस्य फारसं कुणालाच माहिती नव्हते. मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने हे जगासमोर आले आहे. या पुस्तकातील संदर्भांनुसार रेखा यांना वयाच्या 16व्या वर्षी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता.
वयाच्या 15व्या वर्षी शूटिंगदरम्यान या अभिनेत्यानं रेखा यांना केली होती बळजबरीने किस, माजली होती सगळीकडे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 9:00 PM