Join us

अफेयरच्या चर्चेदरम्यान प्रभासनं केलं क्रिती सनॉनचं कौतुक, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:01 PM

Prabhas And Kriti Sanon : साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सनॉन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा 'भेडीया' (Bhediya) चित्रपट लवकरच रिलीज होण्याच्या तयारीत आहे. स्त्री फेम दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर 'भेडिया' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला आहे. ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी तो हिट ठरल्याचा दावा आतापासूनच सुरू केला आहे. दरम्यान, सुपरस्टार प्रभास(Prabhas)नेही आज त्याची कथित गर्लफ्रेंड क्रिती सनॉनच्या आगामी चित्रपटाचा हा ट्रेलर पाहिला आणि त्यावर भाष्य करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.

सुपरस्टार प्रभासने वरुण धवन आणि क्रिती सनॉनच्या भेडियाचा ट्रेलर पाहिल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर कमेंट केली आणि लिहिले, 'ट्रेलर खूपच छान आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. वरूण धवन आणि क्रिती सनॉनला प्रभासकडून मिळालेल्या या कौतुकावर अभिनेत्री क्रिती सनॉनही त्याचे आभार मानल्याशिवाय राहू शकली नाही. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने लिहिले की, 'प्रभास तू खूप क्यूट आहेस... धन्यवाद.' क्रिती सनॉन आणि प्रभास यांच्यातील या संवादाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सनॉन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास रामाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे, तर अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर जेव्हा अभिनेत्री क्रिती सनॉनने कॉफी विथ करण ७च्या गेम राऊंडदरम्यान प्रभासला पहिल्यांदा कॉल केला आणि ज्या पद्धतीने अभिनेत्याने अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून दोघांच्या लिंकअपच्या अफवा समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्र मानतात. 

टॅग्स :प्रभासक्रिती सनॉनवरूण धवन