Join us

'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिकेतल्या द्वारकाबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 12:26 PM

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रचंड हिट ठरत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती.

छोट्या पडद्यावर हिंदी मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रचंड हिट ठरत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासून रसिक या मालिकेला खिळून होते. आता मालिकेत ७ वर्षाचा लिप पिरअड मालिकेत आला आहे. ७ वर्षानंतरची कथा आता मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत आधी बालकलाकार अदिती जलतरेने अहिल्याबाई होळकर यांच्या बालपणाची भूमिका साकारली.

अदितीने या साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.अदितीने साकारलेली अहिल्याबाई होळकरची तरुणपणातली भूमिकेत आता एतशा संझगिरी झळकत आहे. मालिकेत एतशासोबतच आणखीन दोन भूमिकाही रसिकांची प्रचंड पसंतीस पात्र ठरत आहे.

 

अभिनेत्री स्नेहलता वसईकर या मालिकेत अहिल्याबाई होळकरांची सासू गौतमाबाई यांच्या भूमिकेत झळकत आहेत.तर अभिनेत्री सुखदा खांडकेकर या मालिकेत द्वारकाबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.द्वारकाबाई या भूमिकेत सुखदाने सर्वांची पसंती मिळवली आहे. 

ऑनस्क्रीन द्वारकाबाई साकारत असलेली सुखदाही मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आहे. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे. अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता. ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. 

नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं काम करतो आहेस, हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत सुखदाने फेसबुकवर अभिजीतवर स्तुतीसुमनं उधळली होती. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर एकमेकांचा विचार करायला हरकत नाही अशा शब्दांत अभिजीतनंच सुखदाला प्रपोज केलं.

 

सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं आणि 1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही रेशीमगाठीत अडकले. नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं होतं. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :सुखदा खांडकेकरअभिजीत खांडकेकर