ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभिनेता सलमान खानने आपल्या बीईंग ह्युमन या ब्रँडअंतर्गत ई-सायकल लाँच केली आहे. या सायकलच्या लाँचच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सलमान स्वतः घरापासून मेहबूब स्टुडिओपर्यंत सायकल चालवत पोहोचला.
बीईंग ह्युमनच्या या ई-सायकलची किंमत 40 हजार ते 57 हजारांपर्यंत असणार आहे. ही सायकल चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्सची किंवा वाहन नोंदणीची गरज लागणार नाही.
नेहमीच्या सायकलप्रमाणे पॅडल मारुन ही सायकल चालवता येईल. पांढरा, लाल, काळा, पिवळा अशा चार रंगात ही सायकल बाजारात उपलब्ध होणार आहे. या सायकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 25 किलोमीटर इतका असेल.
"जेव्हा लोकांना लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा सायकलने प्रवास करायचा विचारही लोक करत नाहीत, पण या नव्या ई-सायकलला सोपी पॅडल्स आणि रिचार्जैबल बॅटरी असल्याने कुठल्याही गावात किंवा शहरात सहजपणे ही सायकल चालवता येणार आहे",असं या कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला आहे,
"पांढरा, लाल, काळा, पिवळा अशा चार रंगात ही सायकल बाजारात उपलब्ध होणार आहे. या सायकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 25 किलोमीटर इतका असेल.तसंच लवकरच या सायकलमध्ये व्हरायटी उपलब्ध होतील. या ई-सायकलमुळे तुम्ही फिट तर रहालच तसंच पर्यावरणाला यामुळे हानी पोहचणार नाही, असंही सलमान म्हणाला आहे.
सलमान खानच्या बीईंगी ह्युमन या ब्रँड अंतर्गत याआधी कपडे, एक्ससरिज उपलब्ध आहेत. आता एक नवा पर्याय सलमानने फॅन्ससाठी उपलब्ध केला आहे.
कशी असेल सायकल ? पाहा व्हिडीओ