बिग बॉस फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) यांच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'झलक दिखला जा 11' या डान्स रिॲलिटी शोमध्ये शिव ठाकरे सहभागी आहे. या शोच्या फायनलला अवघे काहीच दिवस बाकी असताना शिवच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिव ठाकरेला समन्स पाठवले आहे. शिवसोबतच अब्दू रोजिकवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण लॉर्ड अली असगर शिराझीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. अली असगर शिराझीची कंपनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड अनेक स्टार्टअप्सना आर्थिक मदत करते. यात शिव ठाकरेचे 'ठाकरे फूड अँड स्नॅक्स रेस्टॉरंट' आणि अब्दु रोजिकचे 'बुर्गीर' रेस्टॉरंट देखील समाविष्ट आहे.
शिराजी यांच्या कंपनीने नार्कोच्या मदतीने हे फंडिंग केले होते. त्याचवेळी शिराजीचा नार्कोमध्ये सहभाग झाल्यानंतर शिव आणि अब्दू यांनी त्याच्यासोबतचा करार संपवला होता. आता ईडीने दोघांनाही साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावले आहे. ईडीच्या समन्सवर या दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिव ठाकरे मराठी बिग बॉसचा विजेता आहे आणि सलमान खानच्या बिग बॉस 16 मध्ये तो फर्स्ट रनर अप बनला आहे. अब्दु रोजिकही बिग बॉसमध्ये आला आणि प्रसिद्ध झाला.