रवी चोप्रा दिग्दर्शित लोकप्रिय मालिका महाभारतचा पहिला एपिसोड 2 ऑक्टोबरला पुन्हा प्रसारीत करण्यात आला. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी भीष्म पितामहची भूमिका साकारली होती. महाभारतला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे या मालिकेचे बरेच रिमेक बनवण्यात आले. निर्माते बी.आर. चोप्रा यांनी महाभारत हूबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 2008 साली महाभारतावर आधारीत मालिका एकता कपूरने प्रसारीत केली होती. या मालिकेचे नाव होते कहानी हमारे महाभारत की.
बी.आर. चोप्रा व एकता कपूर यांनी महाभारतवरील मालिकेची निर्मिती केली. 1988 साली प्रसारीत झालेल्या महाभारत मूळ कथेवर आधारीत होते. त्यातील घटना, वेशभूषा खरीखुरी वाटत होती. या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही मालिका कधीही लागली तर सर्व जण ही मालिका तेवढ्याच उत्सुकतेने पाहताना दिसतात. तर एकता कपूरने निर्मिती केलेली महाभारतावरील मालिका आधुनिक बनवली होती. या मालिकेला हवा तितका रिस्पॉन्स मिळाला नाही.
मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी एकता कपूरवर निशाणा साधला होता. त्यांनी महाभारतच्या स्टोरी लाइन बदलून त्यात जास्त गोष्टी मॉडर्न बनवण्यावरून टीका केली होती. मुकेश खन्ना यांनी सांगितले की, मी खूप आधीच एकताला सांगितले होते की तुझी महाभारत चालणार नाही. तिने द्रोपदीला टॅटू लावला आहे आणि पांडव सिक्स पॅकवाले आहेत.
मुकेश खन्ना म्हणाले की, ते 15 चित्रपटांचे हिरो होते. तरीदेखील त्यांनी मुकूट घालून ऑडिशन दिले होते. एकताने फक्त प्रसिद्ध कलाकारांना घेतले आणि कुणालाही कोणतीही भूमिका दिली. हल्लीच्या महाभारताला मालिकेच्या स्वरुपात बनवण्याता प्रयत्न केला जातो. त्यामुळे 1988 साली बनलेल्या महाभारतासारखी बनू शकत नाही. एकता कपूरने महाभारताचा सत्यानाश केला आहे.
मुकेश खन्ना यांनी आरोप केला की महाभारतात भीष्म प्रतिज्ञा पासून मत्स्यगंधाच्या भूमिकेपर्यंत बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या आहेत. जर तुम्ही महाभारत वाचले तर तुमच्या लक्षात येईल की नवीन मालिकेत जो सीक्वेन्स दाखवला आहे तसे महाभारतात काहीच नाही.