Emraan Hashmi : इमरान हाशमीचा विषय निघाला तर सगळ्यात आधी त्याच्या मर्डर सिनेमाची आठवण येते. 2004 मध्ये आलेल्या या सिनेमात इमरान आणि मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होते. यातील दोघांच्या बोल्ड सीन्सची आजही चर्चा होते. दोघांची जोडी खूप पसंत केली गेली होती. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, जेवढी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री चांगली होती, तेवढेच ते रिअल लाईफमध्ये एकमेकांवर नाराज होते.
या दोघांच्या भांडणाची चांगलीच चर्चा झाली होती. करण जोहरचा शो कॉफी विथ करणच्या रॅपिड फायर दरम्यान इमरान मल्लिकाला 'सगळ्यात वाईट किसर' सांगितलं होतं. इमरान म्हणाला होता की, तिच्याऐवजी तो जॅकलिनला निवडेल. तेच मर्डर 2 सिनेमा चांगला असल्याचं तो म्हणाला होता. इतकंच नाही तर त्याला विचारण्यात आलं होतं की, जर तू चुकून मल्लिका शेरावतच्या बेडरूममध्ये शिरला तर काय करशील? यावर तो व्यंक करत म्हणाला होता की, 'एक इडियट गाइड ज्याला हॉलिवूडमध्ये यश मिळवायचं असेल'.
दरम्यान दोघातील हे शाब्दिक युद्ध इथेच थांबलं नव्हतं. करण जोहरच्या शोमध्ये केलेल्या वक्तव्यावर मल्लिकानेही उत्तर दिलं होतं. मल्लिका एका मुलाखतीत म्हणाली होती की, त्याच्यापेक्षा चांगलं किस तर त्या सापाने मला केलं होतं जो 'हिस्स' सिनेमात होता.
नंतर काही वर्षानी मल्लिका शेरावत म्हणाली होती की, त्यांच्यातील भांडण फार बालिश होतं. ती म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना वाटतं की, ते सेटवर आल्यावर त्यांना लगेच खुर्ची मिळावी. पण मी असं कधी केलं नाही. उलट यावरून माझं इतरांसोबत अनेकदा भांडण व्हायचं. हे भांडण मर्डर सिनेमावेळी झालं होतं. आम्ही दोघेही एकमेकांसोबत बोलतही नव्हतो.
सीरिअल किसरचा किसींग रेकॉर्ड
बॉलिवूडचा सीरिअल किसर म्हटला जाणारा इमरान हाशमी 24 मार्चला त्याला 44 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण इमरानला त्याच्यावरील हा ठप्पा अजिबात आवडत नाही. त्याने अनेक सिनेमात किसींग सीन दिले. त्यामुळे त्याच्यावर हा ठप्पा लागला. इतकंच काय तर सगळ्यात लांब किस करण्याचा त्याच्या रेकॉर्डही आहे. राज 3 सिनेमात इमरानने ईशा गुप्ताला 20 मिनिटांपर्यंत किस केलं होतं.