या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका-द क्वीन आॅफ झांशी’ रिलीज होतोय. नेमक्या याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘ठाकरे’ आणि ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’ बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. केवळ इतकेच नाही तर यादरम्यान इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा चित्रपटही धडकणार होता. होता, यासाठी कारण आता इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली आहे. होय, ‘मणिकर्णिका’ व ‘सुपर 30’शी संघर्ष टाळण्यासाठी ‘चीट इंडिया’च्या मेकर्सनी अचानक आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी एक आठवडापूर्वीची तारीख निवडली. आता ‘चीट इंडिया’ २५ जानेवारीऐवजी येत्या १८ जानेवारीला रिलीज होऊ शकतो. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.
चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीशिवाय श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.