KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:13 PM2022-06-01T12:13:22+5:302022-06-01T12:32:01+5:30
KK Death: केकेच्या निधनाची बातमी ऐकून चाहते सुन्न झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. यादरम्यान ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला आहे...
Emraan Hashmi Trends on Twitter : बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारा लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके (KK Krishnakumar Kunnath) याचं काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. कोलकात्यात एका कॉन्सर्टदरम्यानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. धावत पळतच त्याला हॉटेलमध्ये नेण्यात आलं. काही तासानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि रूग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. केकेच्या निधनाची बातमी ऐकून चाहते सुन्न झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. यादरम्यान ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला आहे. ट्विटर युजर्स केके आणि इमरान हाश्मी या जोडीचे गाणी शेअर करत आहेत.
#KK and #EmraanHashmi that's a playlist on its own.
— saurabharya.btc / codestudio.eth (@Saurabh27903870) May 31, 2022
Thank you for making my childhood. Still your voice will be echoing forever ♾️#RIPKK#legendkkpic.twitter.com/m4L1jOBSlP
केकेच्या निधनानंतर ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी का ट्रेंड होतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागे एक खास कारण आहे. इमरान हाश्मीच्या अनेक चित्रपटांसाठी केकेनं अनेक गाणी गायली आहे. हेच कारण आहे की, फॅन्स इमरान हाश्मी व केकेची गाणी शेअर करत आहेत.
इमरान हाश्मी आणि केके यांची जोडी कमाल होती. अशी गाणी दिल्याबद्दल तुमचे आभार, अशा शब्दांत फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
Since my childhood days you've made me a music lover, I still remember how much I tried to learn from u & used fetch my voice to match with your songs... Then being a die hard #EmraanHashmi fan you made me too much attached to you Sir 😭😭 I'll miss you terribly 😭😭😭 #KKforeverpic.twitter.com/JebzWJYxpv
— Samapti Roy (@RoySamapti) May 31, 2022
When mohammed rafi sahab died .. shammi kapoor lost his voice .. #Kk died and i feel emraan hashmi has lost his voice
— Salman Shaikh (@Shaikhsalman1st) May 31, 2022
These two were literally their voices in songs#Kk#EmraanHashmi#emraan#ripkk#Kolkata
इमरान हाश्मीचा आवाज हरपला... मोहम्मद रफी साहेब गेले तेव्हा शम्मी कपूर यांचा आवाज हरपला आणि केके गेला तसा इमरान हाश्मीचा आवाज गेला..., असं ट्विट एका चाहत्याने केलं आहे.
Voice of #EmraanHashmi big losses 🖤💔 #RIPKKpic.twitter.com/7X11kkUV9V
— Mr. Karan Mannu (@KaranMannu10) May 31, 2022
केकेनं हिंदीशिवाय तेलगू, तामिळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली, गुजराती अशा अनेक भाषेत गाणी गायली. खुदा जाने, तुम्ही मेरी शब है, तडप तडप के, यारों दोस्ती अशी सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली.