अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी इमरान एक आहे. अनेक मोठे चित्रपट त्यानं केले आहेत. सध्या तो 'ग्राउंड झिरो' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतेच Amazon प्राइम व्हिडीओने 69 चित्रपट आणि वेब सिरीजची घोषणा केली. यातील काही या वर्षी तर काही येत्या 2025 मध्ये रिलीज होणार आहेत. यापैकी एक म्हणजे इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो'. 2022 पासून या चित्रपटाची चर्चा होत असली तरी आता प्राइम व्हिडीओने याची अधिकृत घोषणा केली आहे
इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीला संवेदनशील परिस्थिती हाताळण्यासाठी काश्मीरला पाठवले जाते. याआधी चित्रपटाचे शूटिंगही श्रीनगरमध्ये झाले होते. यादरम्यान अभिनेता 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. 'ग्राउंड झिरो'बद्दल बोलायचे झाले तर, तेजस देऊस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या प्रोडक्शन बॅनरद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इमरान राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. इम्रानचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला. याशिवाय गेल्या वर्षी हा अभिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता.त्याने आयएसआय एजंट आतिश फतेह कादरीची भूमिका साकारली होती. तसेच तो ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता. तसेच 'शोटाईम' या वेबसीरिजमध्येही तो झळकला.