अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने १०० कोटी रुपयांच्या कथित पॉन्झी स्कीम प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार २० नोव्हेंबर रोजी तिरुचिरापल्ली प्रणव ज्वेलर्सच्या भागीदारी फर्मशी संबंधित मालमत्तेची चौकशी एजन्सीच्या शोधानंतर समन्स पाठवण्यात आले आहे.
भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार
ईडीच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, अभिनेता प्रकाश राज यांना बोलावणे हा प्रणव ज्वेलर्सच्या कथित बोगस सोने गुंतवणूक योजनेच्या व्यापक तपासाचा भाग आहे. ५८ वर्षीय प्रकाश राज या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत आणि त्यांना पुढील आठवड्यात चेन्नईतील फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने छापे टाकून कागदपत्रे, २३.७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड आणि ११.६० किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
प्रणव ज्वेलर्स या संस्थेद्वारे कथितपणे चालवलेली पॉन्झी योजना, प्रणव ज्वेलर्स आणि कथित आर्थिक गैरव्यवहारात असलेल्या इतरांविरुद्ध त्रिची येथे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या माहिती अहवालाच्या आधारे ईडीने कारवाई केली आहे.
प्रणव ज्वेलर्सने सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली आकर्षक परताव्याच्या आश्वासने लोकांकडून तब्बल १०० कोटी रुपये गोळा केले. कंपनीने सांगिलेली याजना पूर्ण केली नाही, यामुळे गुंतवणूकदारांचा तोटा झाला आहे.