Join us

'मथुरेचा नाही पण ओठांचाच विकास', Lip surgery केल्याने हेमा मालिनींची लेक ईशा देओल ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:22 IST

हेमा मालिनी यांच्या समर्थनासाठी त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना मथुरेत आल्या होत्या.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलचा (Esha Deol) काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. ईशा मुलांना घेऊन आईकडेच राहते. हेमा मालिनी सध्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मथुरा येथूनच त्या निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहानाही आईसाठी प्रचार करत आहेत. नुकतंच एका कार्यक्रमात ईशा आणि आहानाने ANI ला प्रतिक्रिया दिली. तेव्हा ईशाने ओठांची सर्जरी केल्याचं स्पष्ट दिसून आलं. यामुळे तिला आता सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं जात आहे.

लोकसभा निवडणूकीत भाजपाकडून लढणाऱ्या हेमा मालिनी मथुरेत जोरदार प्रचार करत आहेत. कालच त्यांच्या दोन्ही मुलींनीही मथुरेत हजेरी लावली. यावेळी ईशा देओलने मथुरेचा किती विकास झाला आहे हे सांगितले. पण ईशाचा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या. कारण तिचे ओठ पहिल्यापेक्षा जास्तच मोठे दिसत आहेत. ईशाने ओठांची सर्जरी केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं  आणि तिला ट्रोल करायला सुरुवात झाली.

ईशाचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'हिच्या ओठांना काय झालं?', 'किती भयानक बोटॉक्स केलंय', 'मथुरेचं तर माहित नाही पण ईशाच्या ओठांचा नक्कीच विकास झालेला दिसतोय' अशा कमेंट्स करत ईशाला ट्रोल करण्यात आलं आहे.

ईशा देओलने 2012 साली भरत तख्तानीसह लग्नगाठ बांधली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीट्रोलसोशल मीडिया