Join us

'माझे वडील जुन्या विचारांचे...', वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न लावणार होते; ईशा देओलचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:38 IST

ईशा देओलचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला.

अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी आहे. ईशानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत काही सिनेमांमध्ये काम केलं. पण ती आईवडिलांसारखी एवढी यशस्वी झाली नाही. त्यानंतर तिने भरत तख्तानीसोबत प्रेमविवाह केला. तिला दोन मुली झाल्या. मात्र काही महिन्यांपूर्वीच ईशाचा घटस्फोट झाला. आता नुकतंच ईशाने एका मुलाखतीत वडील धर्मेंद्र किती जुन्या विचारांचे आहेत याचा खुलासा केला.

'हॉटरफ्लाय' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, "मी सिनेमांमध्ये काम करावं अशी माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. ते पंजाबी वडील आहेत आणि मुलीने १८ व्या वर्षीच लग्न करावं असं त्यांना वाटत होतं. ही त्यांची अटही होती.  कारण ते लहानपणापासून अशाच वातावरणात मोठे झाले जिथे मुलींचं लवकर लग्न होतं. पण मी माझ्या आईला बघत मोठी झाले आहे. मी आईच्या करिअरकडे पाहून प्रभावित व्हायचे. मलाही तिच्यासारखं सिनेमांमधून नाव कमवायचं होतं. पण वडिलांना मला बराच वेळ लागला. पण आता गोष्ट वेगळी आहे."

ती पुढे म्हणाली, "मी खूप शिस्तप्रिय वातावरणात वाढले आहे. माझी आजी म्हणजे आईची आई मला स्पगेटी टॉप आणि छोटा स्कर्ट घालू द्यायची नाही. ती खूप कडक होती. रात्री उशिरापर्यंत आम्हाला बाहेरही राहायला परवानगी नव्हती. अनेकदा खोटं बोलून मी बाहेर जायचे." 

ईशा देओलचा ११ वर्षांचा संसार मोडला आहे. ती पुन्हा अभिनयात कमबॅक करत आहे. आईप्रमाणेच ईशाही उत्तम डान्सर आहे. तिला एक बहीण आहानाही आहे जिचा संसार सुरळीत सुरु आहे.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रबॉलिवूड