Join us

'विग घातलेला बॉबी देओल वाटतोय'; नव्या लूकमुळे इशा देओल ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 14:27 IST

Esha deol: सध्या सोशल मीडियावर इशाच्या नव्या लूकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कूल लुकमध्ये दिसून येत आहे. मात्र, तिच्या याच लूकमुळे ती ट्रोल झाली आहे.

अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारुन प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे इशा देओल(esha deol). अभिनेता धर्मेंद्र(dharmendra)  आणि हेमामालिनी (hemamalini)  यांची लेक असलेल्या इशाने काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले. मात्र, हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला भलतच ट्रोल केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर इशाच्या नव्या लूकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कूल लुकमध्ये दिसून येत आहे. यावेळी तिने मरुन रंगाचा टॉप, ऑफ व्हइट क्रीम रंगाचं जॅकेट आणि ब्राऊन रंगाची लेदरची पँट परिधान केली होती. परंतु, यावेळी तिने केलेल्या हेअर स्टाइलमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

इशाने केलेल्या नव्या हेअर स्टाइलमुळे ती बॉबी देओलसारखी दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना बॉबी देओलसोबत केली आहे. 'पण तू हा विग का घातला आहे', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. तर 'असं वाटतंय बॉबी देओलच विग घालून आला आहे', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर 'तू आर्शी खानप्रमाणेच दिसते', असंही काही जणांनी म्हटलं आहे.

टॅग्स :इशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाबॉबी देओल