Join us

दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा देओलला झाला होता हा गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 5:06 PM

ईशा देओल बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ती दोन मुलींची आई आहे.

ईशा देओलच्या पहिल्या मुलीचं नाव राध्या आहे तर दुसऱ्या मुलीचं नाव मिराया आहे. दोन्ही मुलांच्या प्रेग्नेंसीपासून ती सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ती एका आजाराने ग्रस्त झाली होती. ज्याबद्दल सांगताना ती खूप भावूक झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार इशा देओलला दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन (पीपीडी) हा आजार झाला होता. हा आजार प्रेग्नेंसीदरम्यान झालेल्या हार्मोन्सच्या चढउतारामुळे होतो आणि याला पोस्टमार्टम डिप्रेशन असे म्हटले जाते. या आजारादरम्यान महिलांमध्ये मूड स्विंग, उदासपणा, चिडचिड, रडण्याची इच्छा आणि मुलांना सांभाळू शकेन की नाही, याची चिंतां वाटू लागते. या आजाराबद्दल फार कमी महिलांना माहित आहे.

ईशाने सांगितले की, एकदिवस तिची आई हेमा मालिनी यांनी तिच्या वागणूक नोटीस केली आणि तिला ब्लड टेस्ट करायला सांगितली. एका महिन्यानंतर ईशा ठीक झाली होती.

ईशा देओलने २०१२ साली भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. आता लग्न झाल्यानंतर ईशा नवीन पाऊल टाकते आहे. ती मुलांच्या संगोपनातील अनुभवावर पुस्तक लिहित आहे. या पुस्तकाचे नाव आहे अम्मा मिया. ही माहिती तिने स्वतः ट्विटरवर दिली होती.

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनी