ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - बाहुबली चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घालत सर्व रेकॉर्ड्स तोडले आणि नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित केले. बाहुबलीची ही विक्रमी घोडदौड थांबली असेल असं वाटत असतानाच चित्रपटाने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. बाहुबली चित्रपटाने 50 दिवस पुर्ण केले असून सकाळपासून #50DaysForLegendaryBaahubali2 हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये सुरु आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटरवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार "बाहुबली 2" सध्या 1050 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक नवा रेकॉर्ड आहे.
"बाहुबली 2" अद्याप चीनमध्ये प्रदर्शित झालेला नाही. तरीही जगभरात एकूण 2000 कोटींची कमाई केली आहे. "बाहुबली 2" हिंदीने 500 कोटींची कमाई केली आहे. आमीर खानच्या दंगलवर बाहुबलीने मात केली असून दंगलच्या नावे 387 कोटींची कमाई आहे. करण जोहरने हिंदी बाहुबलीची निर्मिती केली होती.
जगभरात कमाईच्या बाबतीत 1000 कोटींचा टप्पा पार करणार "बाहुबली 2" पहिलाच चित्रपट ठरला. मात्र आमीर खानच्या दंगलने चीनमध्ये प्रदर्शित होताच बाहुबलीला मागे टाकलं आणि कमाईचे सर्व रेकॉर्ड आपल्या नावे केले.
चीनमध्ये ‘श्वाई ज्याओ बाबा’ (लेट्स रेसल डॅड) नावाने दंगल चित्रपट तब्बल सात हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला. चित्रपट रिलीज झाल्यापासून चीनमध्ये तुफान कमाई करत असून सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. 5 मे रोजी चीनमधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या "दंगल" चित्रपटाने जगभरात तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींची कमाई केली आहे. या कमाईसोबत दंगलने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. मात्र "दंगल"ने असा एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे, जो जगभरातील फक्त चार चित्रपटांना करणं शक्य झालं आहे.
जगभरात हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा असून हे चित्रपट सर्वात जास्त कमाई करत असतात. मात्र फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. अशा रितीने 300 मिलिअन डॉलर्सची कमाई करणारा "दंगल" जगभरातील पाचवा चित्रपट ठरला आहे. याआधी चीनमधील दोन, फ्रान्सचा एक आणि जपानाच्या एका चित्रपटाने हा रेकॉर्ड केला आहे. अशाप्रकारे या जागतिक विक्रम करणा-या चित्रपटांच्या यादीत "दंगल"ने पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
A BIG THANK YOU TO ONE & ALL... Celebrating 50 days in 1050 centres across India.