बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचे ‘किल दिल’ आणि ‘हॅप्पी एंडिंग’ हे दोन चित्रपट नुकतेच रिलीज झाले आहेत; पण या चित्रपटांना तिकीट खिडकीवर फारशी कमाल दाखविता आली नाही. अनेक वर्षांनंतर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या गोविंदाला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. असे असले तरी गोविंदा त्याची फी कमी करायला तयार नाही. याउलट त्याने एका निर्मात्याला तगडी फी मागितल्याचे कळते. याबाबत गोविंदाने सांगितले की, ‘माझ्या दोन्ही चित्रपटांतील अभिनयाची प्रशंसा झाली. चित्रपटाचा विषय निर्माता आणि व्यवसायावर अवलंबून असतो. त्यात अभिनेत्याची काहीही भूमिका नसते.’
फ्लॉपनंतरही गोविंदाचे भाव वधारले
By admin | Published: December 18, 2014 12:45 AM