Join us  

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच 'लक्ष्मण' नाराज, प्राण-प्रतिष्ठा समारंभाचं निमंत्रण न मिळाल्यानं स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 4:29 PM

या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने, मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी नाराज झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका 'रामायण' आजही आवडीने बघितली जाते. महत्वाचे म्हणजे, या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणाऱ्या स्टार्सना तर खऱ्या आयुष्यातही प्रेक्षक देवासारखेच मानतात. या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही पाठविण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने, मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी नाराज झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

निमंत्रण मिळाले असते तर बरे वाटले असते -सुनील लाहिरी यांनी नुकतेच 'ईटाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही. याच बरोबर, आपल्याला प्रत्येक वेळेला बोलवायलाच हवे, आवश्यक नाही. पण असे झाले असते, तर चांगले वाटले असते. असो, यामुळे फार नाराज झालेलो नाही. 

सुनील लाहिरी यांनी साधला निशाणा -सुनील लाहिरी म्हणाले, "कदाचित लक्ष्मण अर्थात माझी भूमिका तेवढी महत्वाची नसेल, असे कार्यक्रम आयोजकांना वाटले असेल अथवा त्यांना मी वैयक्तीकरित्या आवडत नसेल. यामुळे त्यांनी मला निमंत्रण दिले नाही. यानंतर, रामायण मालिकेतील इतर कुणालाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही." सुनीलच्या यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते की, त्यांची या कार्यक्रमासाठी जाण्याची इच्छा होती. मात्र निमंत्रण न मिळाल्याने ते जाऊ शकणार नाहीत.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह - लक्ष्मण म्हणजेच सुनील लाहिरी हे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ते रामायणाशी संबंधित जुन्या आठवणींसह नवे फोटो आणि व्हिडिओ देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर सुनील यांना चांगले फॅन फॉलोइंग आहे.

टॅग्स :अयोध्यारामायणराम मंदिर