Join us

रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 5:21 PM

सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा सूर्यवंशी उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर आता हा चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. भारतासह अनेक देशातही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. जवळपास ५ हजार २०० स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवला जाणार आहे. मात्र चित्रपटगृहात रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या कमाईला सुरुवात झाली आहे.

अक्षय कुमारचासूर्यवंशी चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या राईट्सद्वारे त्यांनी २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे ओटीटी राईट्स जवळपास १४० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. तर म्यूझिकच्या राईट्ससाठी जवळपास ६० कोटी रुपये मिळाले आहेत. या सिनेमासाठी एकूण जवळपास २२५ कोटी इतका खर्च आल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती २०० कोटी रुपयात करण्यात आली असून त्याच्या प्रमोशनसाठी २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची थिएटर्समधील कमाई ही निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करेल, असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.सूर्यवंशी या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमारकतरिना कैफरणवीर सिंगअजय देवगण